मुंडे ग्रामीण विकास संस्थेच्या सल्लागार समितीचे पुनर्गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:51+5:302021-09-23T04:04:51+5:30

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्व. गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या दहा सदस्यीय सल्लागार ...

Reorganization of the Advisory Committee of Munde Rural Development Organization | मुंडे ग्रामीण विकास संस्थेच्या सल्लागार समितीचे पुनर्गठन

मुंडे ग्रामीण विकास संस्थेच्या सल्लागार समितीचे पुनर्गठन

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्व. गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या दहा सदस्यीय सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे.

सल्लागार समितीमध्ये विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रभाकर कराड, कायदे तज्ज्ञ ॲड. संजय काळबांडे, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य वसंत सानप, समाजशास्त्रज्ञ डॉ. स्मिता अवचार, उद्योजक सुनील किर्दक, अर्थतज्ज्ञ डाॅ. आर. एस. सोळुंके, कृषी तज्ज्ञ व निवृत्ती सनदी अधिकारी डॉ. भास्कर मुंडे, समाजशास्त्रज्ञ डॉ. भारत खैरनार, सामाजिक कार्यकर्ते म्हणून डॉ. नरेंद्र काळे आदींचा समावेश आहे.

अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यावर या सल्लागार मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. संस्थेला विद्यापीठासोबत पदवी व पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची स्वायत्तता देण्यात आली असून, आवश्यक निधी, स्वतंत्र लोखापरिक्षण, फेलो, सिनीयर फेलो, अशा विविध पदांची व कंत्राटी पदे भरती करण्याचे अधिकारही सल्लागार मंडळाला देण्यात आले आहे.

Web Title: Reorganization of the Advisory Committee of Munde Rural Development Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.