रेणुकाची महाराष्ट्राच्या संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:52 IST2017-12-07T00:52:04+5:302017-12-07T00:52:23+5:30

: हैदराबाद येथे ८ ते १० डिसेंबदरम्यान होणाºया अखिल भारतीय फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयाची खेळाडू रेणुका मोकासे हिची महाराष्ट्राच्या महिला संघात निवड झाली आहे.

Renuka's selection in Maharashtra team | रेणुकाची महाराष्ट्राच्या संघात निवड

रेणुकाची महाराष्ट्राच्या संघात निवड

औरंगाबाद : हैदराबाद येथे ८ ते १० डिसेंबदरम्यान होणाºया अखिल भारतीय फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयाची खेळाडू रेणुका मोकासे हिची महाराष्ट्राच्या महिला संघात निवड झाली आहे. पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी उमाकांत शिराळे यांची, तर महिला संघाच्या व्यवस्थापकपदी प्रा. भक्ती मोदाळे यांचीही निवड झाली आहे. या निवडीबद्दल जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, सचिव श्रीमंत शिसोदे, उपाध्यक्ष दीपक मसलेकर, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव गंगाधर मोदाळे, कैलास पटणे, डी.डी. लांडगे, उदय पंड्या यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Renuka's selection in Maharashtra team