रेणुकामाता यात्रेस आजपासून प्रारंभ

By Admin | Updated: April 25, 2016 00:09 IST2016-04-24T23:54:15+5:302016-04-25T00:09:57+5:30

तळेगाव : भोकरदन तालुक्यातील तळेगाव येथून जवळच असलेल्या रिधोरा देवी येथील आराध्य दैवत असलेल्या रेणुकामाता यात्रेस चौत्र पौर्णिमा २२ एप्रिलपासून प्रारंभ झाला.

Renuka Kamata Yatra starts from today | रेणुकामाता यात्रेस आजपासून प्रारंभ

रेणुकामाता यात्रेस आजपासून प्रारंभ


तळेगाव : भोकरदन तालुक्यातील तळेगाव येथून जवळच असलेल्या रिधोरा देवी येथील आराध्य दैवत असलेल्या रेणुकामाता यात्रेस चौत्र पौर्णिमा २२ एप्रिलपासून प्रारंभ झाला. ही यात्रा अक्षय तृतीयापर्यंत चालते. पौर्णिमेच्या दिवशी पुरातन परंपरेनुसार १२ गाड्या ओढण्याचा उत्सव असतो.
या यात्रेसाठी भोकरदन-सिल्लोड, औरंगाबाद, राजूर, फुलंब्री, बुलढाणा, बदनापूर, करमाड, रत्नपूर, पद्मावती, सय्यदपूर आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात. ही यात्रा खास करुन मसाला विक्रीसाठी प्रसिध्द आहे. तसेच स्थानिक नागरिक, नातेवाईक तथा सर्व चाकरमानीवर्ग खास नोकरवर्ग खरेदीसाठी सुट्टी काढून दरवर्षी यात्रेस न चुकता हजेरी लावतात. जिर्णोध्दाराचे काम १९२२ साली झाले असून मंदिराचे बांधकाम हे निजामकालीन असून विटा आणि चुन्याचे झाले आहे. मंदिराच्या कळसाचे काम १९४७ नंतर करण्यात आले. रिधोरा रेणुकामाता ही माहुरगड येथील प्रतिरुप असल्याचे गावकरी सांगतात.

Web Title: Renuka Kamata Yatra starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.