सुखप्राप्तीसाठी धर्माचे पालन आवश्यक
By Admin | Updated: January 31, 2017 23:30 IST2017-01-31T23:22:23+5:302017-01-31T23:30:33+5:30
परळी सुख प्राप्तीसाठी धर्माचे पालन आवश्यक आसल्याचे विचार श्री गुरू ष.ब्र. १०८ दिगांबर शिवाचार्य महाराज (थोरला मठ) वसमतकर यांनी आपल्या प्रवचनातून मांडले.

सुखप्राप्तीसाठी धर्माचे पालन आवश्यक
परळी : गुरू, लिंग, जंगमाची सेवा करावी असा उपदेश श्री संत शिरोमणी मन्मथस्वामींनी केलेला आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करावे, सुख प्राप्तीसाठी धर्माचे पालन आवश्यक आसल्याचे विचार श्री गुरू ष.ब्र. १०८ दिगांबर शिवाचार्य महाराज (थोरला मठ) वसमतकर यांनी आपल्या प्रवचनातून मांडले.
येथील श्री.संत गुरूलिंगस्वामी मठसंस्थान (बेलवाडी) येथे सोमवार पासून संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सवानिमित्त येथील वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. सोमवारी सकाळी शिवपाठ, परमरहस्यपारायण झाले. त्यानंतर दुपारी १ वा.दिगांवर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमतकर यांचे प्रवचन झाले.
प्रवचन करताना शिवाचार्य महाराज म्हणाले की, वीरशैव समाजातील प्रत्येकानेच गळ्यात लिंग धारण करणे आवश्यक आहे. इष्ठलिंगाचे महत्व त्यांनी सांगीतले. मनुष्य हा दुर्लभ आहे. देह उत्तम आहे. गुण आणि संस्कार नसेल तर मनुष्याला किंमत नाही. अनमोल देह जपण्यासाठी गळ्यात लिंग धारण करणे गरजेचे आहे. केलेले कर्म देवाला अर्पण केले तर पाप लागत नाही. आपल्या पाल्यांना आठव्या वर्षाच्या आत दीक्षा दिली पाहिजे. आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याचे काम आई-वडीलच करतात. म्हणूनच मातृ देवो भव, पितृ देवो भव म्हटले जाते. त्यानंतर आचार्य देव भव असे म्हटले जाते.
पवित्र देवाला पवित्रताच आवडते म्हणून प्रत्येकाने पवित्र राहिले पाहिजे. ज्या धर्मात आलोत त्या धर्माचे पालन करावे. असे सांगून त्यांनी मनाला मंथन करणारे मन्मथ स्वामी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. जंगम हे शिवाचे मुख आहे. असेही ते म्हणाले.
प्रारंभी श्री संत मन्मथस्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनोज संकाये, मीरा संकाये या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शिवपाठ व परम रहस्य पारायणास पाचशेपेक्षा अधिक महिला व पुरूष सहभागी झाले होते.
या कार्यक्र मात शिवाचार्यांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचलन सोनल रोडे यांनी केले. तर आभार चेतन सौंदळे यांनी मानले. (वार्ताहर)