शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तयारी शाळेची, पालकांना दिलासा! पहिल्यांदाच वह्यांच्या किमती घसरल्या, रजिस्टरचे भाव स्थिर

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 22, 2024 19:42 IST

वार्षिक निकाल लागताच त्या दिवशी नवीन शैक्षणिक वर्षासाठीच्या वह्या खरेदीचा नवा ट्रेंड पालकांमध्ये आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षाला जून महिन्यात सुरुवात होणार आहे. शालेय साहित्य, स्टेशनरी खरेदीचे सर्वसामान्य पालकांना नक्कीच टेन्शन आले असेल. कारण, त्यांना घरखर्चात तडजोड करून विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावर खर्च करावा लागणार आहे. मात्र, दिलाशाची बाब म्हणजे यंदा उत्पादकांनी वह्यांच्या किमती कमी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्या किमतीत वह्या विकत दिल्या होत्या, त्याच किमतींत यंदा वह्या मिळणार आहेत.

का कमी झाल्या वह्यांच्या किमती?कागदाच्या किमतीत घट झाली आहे. कोरोना काळानंतर कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. आता पुरवठा सुरळीत झाला आहे. परिणामी उत्पादकांनी वह्यांच्या किमती कमी केल्या आहेत. १०० पानी वहीमागे ५ रुपये व २०० पानी वहीमागे ५ रुपये कमी करण्यात आले आहेत.

मागील वर्षी व यंदाच्या किमती (प्रतिनग)वह्या             २०२२ २०२३ २०२४१०० पानी वही २५ रु. ३० रु. २५ रु.२०० पानी वही ५० रु. ६५ रु. ६० रु.२०० पानी रजिस्टर ६० रु. ७५ रु. ७५ रु.

रजिस्टरच्या किमती स्थिरउत्पादकांनी रजिस्टरच्या किमती कमी करण्याऐवजी दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे. मुखपृष्ठाची जाडी थोडी वाढवून मॅट फिनिशिंग केले आहे. तसेच बहुतांश रजिस्टरवर निसर्गचित्रे छापण्यात आली आहेत. मागील वर्षाप्रमाणे २०० पानी रजिस्टर ७५ रुपये प्रतिनग विकले जात आहे.

निकालादिवशी वह्या खरेदीचा नवा ट्रेंडवार्षिक निकाल लागताच त्या दिवशी नवीन शैक्षणिक वर्षासाठीच्या वह्या खरेदीचा नवा ट्रेंड पालकांमध्ये आला आहे. मुंबई व पुण्यात हा ट्रेंड जुना आहे. आता तोच ट्रेंड येथे आला आहे. यंदा इंग्रजी शाळांतील निकाल लागला आणि त्याच दिवशी अनेक पालकांनी वह्या खरेदी केल्या. इंग्रजी मध्यमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांनी वह्या खरेदी केल्या आहेत.

१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांची खरेदी पूर्णप्रत्येक शाळेत नववीचा निकाल लवकर जाहीर करण्यात येतो व इयत्ता १० वीचा अभ्यासक्रम सुरू केला जातो. तसेच ११ वीचा अभ्यासक्रम लवकर संपवून उन्हाळ्यात १२वीचा अभ्यासक्रम सुरू केला जातो. क्लासेसही एप्रिलपासून सुरू करतात. या विद्यार्थ्यांची वह्या व रजिस्टरची खरेदी पूर्ण झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

४५ लाख वह्यांची आवकनवीन शैक्षणिक वर्षासाठी मुंबई व जालना येथून ४५ लाख वह्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. मे व जून महिन्यांत यांपैकी ३८ लाख वह्यांची विक्री होईल. उर्वरित ७ लाख वह्यांची विक्री दिवाळीपर्यंत केली जाईल. ४५ लाखांपैकी ८० टक्के वह्या मुंबईतून, तर २० टक्के वह्या जालना येथील उत्पादकांकडून आणण्यात आल्या आहेत. तसेच ९५ टक्के वह्यांची मुखपृष्ठेच आता खाकी रंगाची आहेत.- सुनील अजमेरा, सहसचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :SchoolशाळाAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रMarketबाजार