बेकरीतून परप्रांतीय बालमजुरांची मुक्तता

By Admin | Updated: May 23, 2014 00:17 IST2014-05-22T23:35:31+5:302014-05-23T00:17:52+5:30

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाच्या पथकाने शहरातील बार्शी नाका परिसरातील एका बेकरीत काम करणार्‍या अल्पवयीन मुलांना धाड टाकून सोडविले़

The release of parasitic children from the bakery | बेकरीतून परप्रांतीय बालमजुरांची मुक्तता

बेकरीतून परप्रांतीय बालमजुरांची मुक्तता

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाच्या पथकाने शहरातील बार्शी नाका परिसरातील एका बेकरीत काम करणार्‍या अल्पवयीन मुलांना धाड टाकून सोडविले़ या प्रकरणी बेकरी मालकासह अन्य दोघांवर पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेकरी मालक मोहम्मद तस्लीम आयस मोहंमद रा़ इमामपुर व मॅनेजर अझरुद्दीन मोहंमद जाना, पेठ बीड असे त्या दोन आरोपींंची नावे आहेत़ शहरातील बार्शी नाका परिससरातील इमामपुर रोड येथे जालना फेमस बेकरी आहे़ या बेकरीत दोन परप्रांतिय मुले काम करत असल्याची माहिती जिल्हा कृती दलास कळाली़ त्यानुसार त्यांनी बुधवारी त्या बेकरीवर धाड टाकली असता दोन अल्पवयीन मुले मिळुन आली़ अफसर कासेम करम हुसेन (वय १३) रा बनेक, ता बोरी, जि़ सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश व महोम्म्म जमीर गुलाम हुसेन (वय १३) रा़ इदवा, जि़ सिद्धार्थ नगर असे त्या बेकरीत काम करणार्‍या मुलांची नावे आहेत़ या दोन मुलांना बेकरीत काम करण्यसाठी सिद्धार्थ नगर येथुन काम करण्यासाठी आणले होते अशी प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली़ सरकारी कामगार अधिकारी युवराज पडियाल यांनी फिर्याद दिली. ही कारवाई महिला बाल कल्याण विभागाच्या पी़डब्ल्यू. वंजारी, ड़ीव्ही़ धोतरे, समिती सदस्य तत्वशील कांबळे, पोलिस निरीक्षक सुदाम पगार, एसक़े़ सानप, आऱएऩ पोहणे, पी़पी़ यादव यांनी केली़ या कारवाईने व्यावसायिकात खळबळ उडाली. (प्रतिनिधी)

Web Title: The release of parasitic children from the bakery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.