शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन आरक्षण सोडतीमुळे मातब्बरांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST

वाळूज महानगर : सरपंचपदाच्या नवीन आरक्षण सोडतीमुळे गावपातळीवरील मातब्बरांचा जीव टांगणीला लागला आहे. पूर्वीचे आरक्षण कायम राहते की नवीन ...

वाळूज महानगर : सरपंचपदाच्या नवीन आरक्षण सोडतीमुळे गावपातळीवरील मातब्बरांचा जीव टांगणीला लागला आहे. पूर्वीचे आरक्षण कायम राहते की नवीन आरक्षण आरक्षण निघते यामुळे उद्योगनगरीतील २१ ग्रामपंचायतींच्या ‘भावी’ सरपंचाची धाकधूक वाढली आहे.

वाळूज व एमआयडीसी हद्दीतील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकच्याच पार पडल्या असून, निकालही जाहीर झाला आहेत. मात्र, शासनाच्या वतीने पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सरपंचपदाचे आरक्षण रद्द करून निकालानंतर नव्याने आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांना रणनीतीत बदल करावा लागला. या श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. यंदाच्या निवडणुकीत रांजणगावात आ. प्रशांत बंब, पंढरपुरात जि.प. सदस्य रमेश गायकवाड, पं.स. सदस्य शममबी चौधरी, माजी सरपंच शेख अख्तर, तर तीसगावात माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे, नारायणपुरात माजी सरपंच नासेर पटेल, अंबेलोहळमध्ये मनसेचे दिलीप पा. बनकर यांनी बहुमत मिळविले आहे. वळदगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून, आदर्श पाटोदा गावात सत्तांतरण झाले आहे. मात्र, जोगेश्वरी व वाळूज येथे त्रिशंकू अवस्था असल्याने या दोन ग्रामपंचायतींची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मातब्बर राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी दगा फटका होऊ नये, यासाठी वाळूज व जोगेश्वरी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे. रांजणगाव, तीसगाव व पंढरपुरात सरपंचपदासाठी जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच सुरू आहे.

असे होते पूर्वीचे आरक्षण

रांजणगावात गत पंचवार्षिकला एससी महिला, वाळूजला एससी पुरुष, नारायणपुरात ओबीसी महिला, जोगेश्वरी, वळदगाव, पंढरपूर, पाटोदा सर्वसाधारण असे आरक्षण होते. आता २९ जानेवारी रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे भावी सरपंचांची धाकधूक वाढली आहे. नवीन आरक्षण सोडतीत सरपंचपदाची लॉटरी कुणाला लागते, याकडे वाळूजमहानगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

--------------------------------