जिल्हा रुग्णालयात कर्मचाºयांशीच वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:28 IST2017-09-28T00:28:40+5:302017-09-28T00:28:40+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या मुलीच्या वडिलाने मी आमदाराच्या गावचा असल्याने मला सर्वच सुविधा देण्याचा हट्ट रुग्णालयाकडे केला. तो पूर्ण करुनही परिचारिकांसोबत वाद घालत कर्मचाºयांशी झटापट केली. शहर पोलिसांशी संपर्क साधाताच काही क्षणातच पोलीस कर्मचारी हजर झाल्यामुळे पुढील वाद टळला.

Regarding employee of the district hospital | जिल्हा रुग्णालयात कर्मचाºयांशीच वाद

जिल्हा रुग्णालयात कर्मचाºयांशीच वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या मुलीच्या वडिलाने मी आमदाराच्या गावचा असल्याने मला सर्वच सुविधा देण्याचा हट्ट रुग्णालयाकडे केला. तो पूर्ण करुनही परिचारिकांसोबत वाद घालत कर्मचाºयांशी झटापट केली. शहर पोलिसांशी संपर्क साधाताच काही क्षणातच पोलीस कर्मचारी हजर झाल्यामुळे पुढील वाद टळला.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात परवीन बी. शेख कट्टू (रा. वाकद) ता. रिसोड. यांना गरोदर पिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केले होते. परवीनचे वडील आडगाव मुटकुळे या गावचे आहेत. हे गाव विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे यांचे आहे. मुटकुळे यांनाही हा रुग्ण आहे की नाही, हे माहिती नसेल मात्र त्यांचे नाव वापरून रुग्णाच्या पित्याने यंत्रणेला चांगलेच राबविले. अधिकारी, कर्मचाºयांनीही रुग्ण आमदारांच्या गावचा आहे, झंझट नको म्हणून रुग्णालयातील सुविधा मोफत उपलब्ध करुन दिल्या होत्या. यासाठी परिवीनचे वय ज्येष्ठ नागरिकांत बसत नसतानाही त्यांच्या केस पेपरवर ज्येष्ठ नागरिकांचा शिक्का मारुन दिला होता. एवढेच नव्हे, तर त्याच केस पेपरवर दारिद्र्यरेषेखालील असल्याचाही शिक्का मारला होता. परंतु सदरील रुग्ण या दोन्हीही नियमांत बसत नव्हता.
तेव्हा दारिद्र्यरेषेखालील कार्ड जमा करण्यासाठी परिचारिकेने सांगितले होते. नसता प्रत्येक दिवसांप्रमाणे फिस भरण्यास सांगताच परविनच्या वडिलाने गोंधळ घातला. त्यांना समजून सांगण्याचा खुप प्रयत्न केला जात होता. मात्र ते कोणाला तरी फोन लावून समोर असलेल्या अधिकारी कर्मचाºयांच्या कानाला लावत होते. त्यामुळे काही काळी रुग्णालयातील कर्मचारीही गोंधळून गेले होेते. गोंधळ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
परिचारिकेने पैसे मागितल्याचा तेवढा आरोप महिलेचे नातेवाईक करीत होते. परंतु संबंधित परिचारिकेला विचारणा केली असता डीआरडी कार्ड नसल्याने प्रत्येक दिवसाची फिस भरण्यास रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितल्याचे परिचारिकेने सांगितले.

Web Title: Regarding employee of the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.