दूध संकलन घटले

By Admin | Updated: March 17, 2015 00:42 IST2015-03-17T00:21:08+5:302015-03-17T00:42:46+5:30

हणमंत गायकवाड , लातूर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असली तरी यंदा मात्र दूध उत्पादनात घट होत आहे़ गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सरासरी

Reduced milk collection | दूध संकलन घटले

दूध संकलन घटले


हणमंत गायकवाड , लातूर
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असली तरी यंदा मात्र दूध उत्पादनात घट होत आहे़ गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सरासरी ४९ हजार ५६४ लिटर प्रतिदिनी दूध संकलन होत होते़ यंदा फेब्रुवारी महिन्यात प्रतिदिन सरासरी ४६ हजार ०७ लिटर संकलन होत आहे़ ३ हजार ५५७ लिटरची घट आहे़ झपाट्याने संकलन कमी होत आहे़ चारा-पाणी टंचाईचा हा परिणाम फेब्रुवारी महिन्यापासून जाणवत आहे़
जिल्हा दुग्ध शाळा विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने दूध संकलनावर नियंत्रण ठेवले जाते़ सहकारी जिल्हा संघ आणि तालुका संघामार्फत तसेच खाजगी दूध प्रकल्पामार्फत शेतकऱ्यापासून दूध संकलन केले जाते़ सहकारी संस्थेच्या १४९, तालुका संघाच्या १२ आणि खाजगी ५ दूध प्रकल्पाअंतर्गत दूध संकलनाची प्रक्रिया जिल्ह्यात प्रतिदिन चालते़ जिल्हा संघ आणि तालुका संघाबरोबर खाजगी दुध प्रकल्पामध्ये कपिला डेअरी प्रोजेक्ट, गोपाळ महाराज मिल्क प्रोडक्ट, वारणा डेअरी लामजना आणि शिरुरअनंतपाळ, रिलायन्स दूध प्रकल्प उदगीर, साई डेअरी बाभळगाव या पाच खाजगी संस्थांचा समावेश आहे़ जिल्ह्यात सध्यस्थितीत १४९ सहकारी मार्फत १२ हजार ८९० लिटर दर दिवसाला दूध संकलन होत आहे़ तालुका संघाच्या १२ संस्थामार्फत ३ हजार ९६ लिटर आणि खाजगी ५ दुध प्रकल्पाअंतर्गत ३० हजार २२ लिटर दिवसाला दुध संकलन केले जाते़ एकूण ४६ हजार ९७ लिटर संकलन होत आहे़ हे संकलन दर दिवसाचे आहे़
महिन्याचा विचार केला तर सरासरी १३ लाख ८० हजार २१० लिटर दूध संकलन आहे़ हे संकलन गेल्या फेब्रुवारी महिन्यातले आहे़ गतवर्षी याच फेब्रुवारी महिन्यात जिल्हा संघाचे १८ हजार ८९०, तालुका संघाचे ६ हजार ५३७, खाजगी प्रकल्पाचे २३ हजार ६३७ असे एकूण सरासरी ४९ हजार ५६४ प्रतिदिनी दूध संकलन होते़ म्हणजे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सरासरी १४ लाख ८६ हजार ९२० लिटर दूध संकलन होते़ गतवर्षीच्या तुलनेत दिवसाला ३ हजार ५५७ लिटर आणि महिन्याला १ लाख ६ हजार ७१० लिटरची घट आहे़
चारा-पाणी टंचाई असली तरी जिल्ह्यात ८० हजार ६१४ दूध देणाऱ्या म्हशी आहेत़ दूध देणाऱ्या संकरित गायी ८ हजार ४२८ असून दूध देणाऱ्या देशी गायींची संख्या ५७ हजार ४१४ आहे़ जिल्ह्यात दुभते धन १ लाख ४६ हजार ४५६ आहे़

Web Title: Reduced milk collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.