दुग्धव्यवसायाला नेकनुरात उतरती कळा

By Admin | Updated: February 9, 2016 00:29 IST2016-02-08T23:55:07+5:302016-02-09T00:29:44+5:30

पद्माकर वाघ , नेकनूर बीड तालुक्यातील नेकनूर परिसरातील शेतजमीन मध्यम असल्याने येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे कल दाखविला. अल्पावधीतच हा व्यवसाय

Reduce the milk production | दुग्धव्यवसायाला नेकनुरात उतरती कळा

दुग्धव्यवसायाला नेकनुरात उतरती कळा


पद्माकर वाघ , नेकनूर
बीड तालुक्यातील नेकनूर परिसरातील शेतजमीन मध्यम असल्याने येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे कल दाखविला. अल्पावधीतच हा व्यवसाय भरभराटीस येऊन अनेक शेतकऱ्यांनी प्रगती साधली. परिसरात दूध डेअऱ्या उभारल्याने रास्त भाव मिळाला. आज चित्र पालटले असून, दुधाचे भाव निम्यावर, तर पशुखाद्याचे भाव दुपटीने वाढल्याने दुग्धव्यवसाय शेवटची घटका मोजत आहे.
जनावरांच्या चाऱ्यावर होणारा खर्च व दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे समसमान असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. बालाघाट परिसरात पडीक क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न उद्भवत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती या मुख्य व्यवसायापेक्षा दुग्ध व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले. याच कालावधीत दुधाला योग्य दर मिळाल्याने जोडव्यवसायावर परिसरातील शेतकरी सधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यातच दुधाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. या भागात खवा उत्पादकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही घटलेल्या उत्पादनाची झळ आहे.

Web Title: Reduce the milk production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.