शौचालय नसलेल्या घरांवर लागणार ‘रेड स्टिकर’ !

By Admin | Updated: November 19, 2015 00:23 IST2015-11-19T00:05:06+5:302015-11-19T00:23:44+5:30

एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ शौचालय बांधकामास गती मिळावी. त्याचबरोबर ‘घर तेथे शौचालय’ बांधले जावे. त्याचा शंभर टक्के वापर केला जावा, यासाठी स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शौचालय

'Red Sticker' will be required for non-toilets! | शौचालय नसलेल्या घरांवर लागणार ‘रेड स्टिकर’ !

शौचालय नसलेल्या घरांवर लागणार ‘रेड स्टिकर’ !


एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ
शौचालय बांधकामास गती मिळावी. त्याचबरोबर ‘घर तेथे शौचालय’ बांधले जावे. त्याचा शंभर टक्के वापर केला जावा, यासाठी स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शौचालय नसणाऱ्या घरांना आता ‘रेड स्टिकर’ लावण्यात येणार असून, जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शौचालय नसणारे घर सहजपणे लक्षात येणार आहे.
शौचालय बांधकामास चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी शौचालयाचे बांधकाम करणाऱ्यांना १२ हजारांचे अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यामुळे शौचालय बांधकामास चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक गावांत शौचालयाचे बांधकाम केले जात असल्याचे दिसून येत आहे. तरीही काही गावांतील कुटुंबांकडून शौचालय बांधकामास योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरांवर कोणते ना कोणते तरी स्टिकर लागणार आहेच. यात शंभर टक्के शौचालयाचा वापर करणाऱ्याच्या घरावर ‘ग्रीन स्टिकर’ (लय भारी) तर शौचालयाचे बांधकाम नसणाऱ्यांच्या घरावर ‘रेड स्टिकर’ लागणार आहे. याशिवाय, शौचालयाचा अर्धवट वापर करणाऱ्याच्या घरावर ‘फिफ्टी फिफ्टी’ चे स्टिकर लागणार आहे. तसेच शौचालय जीर्ण झाले असेल तर ‘जरा जपून’चे सिग्नल लावले जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हे काम केले जाणार असून, तालुक्यातील एकंदर सात गावांत ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे शौचालय बांधकाम नसलेली घरे सहज ओळखता येणार आहेत.

Web Title: 'Red Sticker' will be required for non-toilets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.