‘लाळी’ला लाल कार्ड

By Admin | Updated: August 14, 2014 01:56 IST2014-08-14T01:30:10+5:302014-08-14T01:56:44+5:30

एम़ जी़ मोमीन ,जळकोट तालुक्यातील एकूण गावांपैैकी जवळपास निम्म्या गावांतील पाणी पिण्यास बाधक ठरण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे़ तालुक्यातील १८ गावांना पिवळे

Red Card to 'Lali' | ‘लाळी’ला लाल कार्ड

‘लाळी’ला लाल कार्ड




एम़ जी़ मोमीन ,जळकोट
तालुक्यातील एकूण गावांपैैकी जवळपास निम्म्या गावांतील पाणी पिण्यास बाधक ठरण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे़ तालुक्यातील १८ गावांना पिवळे तर लाळी बु़ या गावास लाल कार्ड देऊन धोका बजावला आहे़
जळकोट तालुक्यात ४३ ग्रामपंचायती आहेत़ गावातील जलस्त्रोतांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येते़ पाणी पिण्यास योग्य असलेल्या गावांना हिरवे कार्ड दिले जाते़ पिवळे कार्ड देण्यात येणाऱ्या गावांना पाण्यापासून धोका होण्याची भिती व्यक्त केली जाते़ तर लाल कार्ड देण्यात आलेल्या गावातील पिण्याचे पाणी आरोग्यास हानीकारक असल्याचे स्पष्ट होते़ तालुक्यातील प्रत्येक गावांतील जलस्त्रोतांची वैैद्यकीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेमार्फत करण्यात आली़
जुलैै अखेर तालुक्यातील सर्व जलस्त्रोतांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते़ ही तपासणी करण्यात येऊन त्यानुसार २४ ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड देण्यात आले़ १८ गावांना पिवळे कार्ड देण्यात येऊन जलस्त्रोताचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ त्याचबरोबर आवश्यक ती पाणीपुरवठ्यासाठीची दुरुस्ती करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे़ ग्रामपंचायतीने गटारी साफ कराव्यात़, गावात स्वच्छता राहण्यासाठी प्रयत्न करावा, असेही स्पष्ट करण्यात आले असल्याचे डॉ़ प्रशांत कापसे यांनी सांगितले़

Web Title: Red Card to 'Lali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.