शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

...जीवघेणी ‘भरती’ !

By admin | Updated: November 4, 2014 01:38 IST

बीड : पोलीस भरती असो की सैन्य भरती, प्रत्येक भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरत आहे. भरती दरम्यान योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्यानेच उमेदवारांवर जीव गमवण्याची वेळ येत आहे.

बीड : पोलीस भरती असो की सैन्य भरती, प्रत्येक भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरत आहे. भरती दरम्यान योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्यानेच उमेदवारांवर जीव गमवण्याची वेळ येत आहे. याचे ज्वलंत उदाहरण बीडच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सैन्य भरतीदरम्यान दिसून आले. यापूर्वीही झालेल्या पोलीस भरती दरम्यान महिला उमेदवाराला चक्कर आली होती.सय्यद जमीर सय्यद बालम (वय २०, रा़ चापडगाव, ता़ कर्जत, जि़ अहमदनगर) या उमेदवाराचा सोमवारी सकाळी वैद्यकीय चाचणी दरम्यान मृत्यू झाला. चार महिन्यापूर्वी याच मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना पुरेशा सोयी-सुविधा मिळाल्या नव्हत्या. त्यावेळीही एका महिला उमेदवाराला धावताना चक्कर आली होती. त्या महिलेला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली. सोमवारीही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सतर्क राहिले असते तर ‘मिल्ट्रीमॅन’चे स्वप्न उराशी बाळगून भरती प्रक्रियेत उतरलेल्या जमीरचा मृत्यू झाला नसता, अशी चर्चा ऐकावयास मिळाली.चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या भरतीत अनेक सुविधांचा अभाव होता. सुविधा नसल्यामुळेच उमेदवारांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे उमेवारांमधून नाराजीचा सूर निघत होता. (प्रतिनिधी)पोलीस भरतीदरम्यान बीडमध्ये अनेक महिला, पुरूष उमेदवारांना चक्कर येणे, बेशुद्ध पडणे यासारखे प्रकार घडले होते. ४भर उन्हातही भरती प्रक्रिया घेतली जात असतानाही उमेदवार नोकरीच्या आशेने चाचणी देत होते. कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. ४त्यावेळेस सहन केले आणि आताही सहन केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरू लागली आहे़४यापूर्वी पोलीस भरतीदरम्यान घडलेल्या घटना पाहता सुद्धा प्रशासनाच्या वतीने कसलीच काळजी घेण्यात आली नसल्यानेच सोमवारी जमीरचा मृत्यू झाला, असा आरोप जमीरच्या नातेवाईकांनी केला आहे़