भरती चार वर्षांपासून रखडली
By Admin | Updated: February 20, 2015 00:09 IST2015-02-19T23:26:13+5:302015-02-20T00:09:18+5:30
वडवणी : मागील चार वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस भरती प्रक्रिया रखडली आहे. नवीन सरकार होऊन १०० दिवसांचा कालावधी होऊनही या प्रक्रियेकडे कोणाचे लक्ष नाही

भरती चार वर्षांपासून रखडली
वडवणी : मागील चार वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस भरती प्रक्रिया रखडली आहे. नवीन सरकार होऊन १०० दिवसांचा कालावधी होऊनही या प्रक्रियेकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
वडवणी तालुक्यात ९७ अंगणवाड्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने २०११ मध्येच तालुक्यातील अनेक गावात अंगणवाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चार वर्षापूर्वीच अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस महिलांची भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पात्र असणाऱ्या शेकडो महिलांनी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल केले होते मात्र सदर प्रक्रिया रद्द झाली.
त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा तालुक्यातील नवीन २९ अंगणवाडी आणि ६ मिनी अंगणवाड्यांसाठी अर्ज मागविण्यात आले. शेकडो लाभाथ्यांनी अर्ज दाखल करून अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस म्हणून दावा केला आहे. मात्र ही निवड प्रक्रिया देखील दोन वर्षांपासून रखडली आहे. ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी मागील राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी समिती गठीत केली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने वेळेत काम उरकून समितीपुढे अर्ज ठेवले नसल्याने प्रक्रिया सूत्रांनी सांगितले.
मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात
मनसेचे जिल्हा सचिव यशवंत उजगरे यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे प्रक्रिया रखडल्याचा आरोप केला असून २० फेब्रुवारीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)