कंत्राटी अधिपरिचारिकांना पुन्हा सेवेत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:48+5:302021-02-05T04:22:48+5:30
------- निरीक्षण बोगीद्वारे रेल्वे अधिकाऱ्याकडून पाहणी औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील अधिकाऱ्यांनी रविवारी नांदेड विभागात रेल्वे बोगीद्वारे ...

कंत्राटी अधिपरिचारिकांना पुन्हा सेवेत घ्या
-------
निरीक्षण बोगीद्वारे रेल्वे अधिकाऱ्याकडून पाहणी
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील अधिकाऱ्यांनी रविवारी नांदेड विभागात रेल्वे बोगीद्वारे पाहणी केली. रेल्वे रूळ, रेल्वे गेटसह स्टेशनच्या परिस्थितीचा त्यांच्याकडून आढावा घेण्यात आला. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.
---------
न्यू एस. बी. एच. कॉलनीत कचऱ्याचे ढीग
औरंगाबाद : न्यू एस. बी. एच. कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोरच गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिकेकडून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
-----------
रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर स्वच्छतागृह उभारा
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीसमोर सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी उघड्या जागेत प्रवाशांकडून लघुशंका केली जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छतागृहाची सुविधा उभारण्याची मागणी होत आहे.
-----------
मध्यवर्ती बसस्थानकासमोर रिक्षांच्या रांगा
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे ये-जा करताना एसटी चालकांना अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. याकडे एसटी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.