लोकअदालतीत १४ कोटींची वसुली

By Admin | Updated: June 29, 2014 00:45 IST2014-06-29T00:41:13+5:302014-06-29T00:45:03+5:30

जालना : प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांसाठी शनिवारी आयोजित लोकअदालतीत एकूण २३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

Recovery of public money collection of 14 crores | लोकअदालतीत १४ कोटींची वसुली

लोकअदालतीत १४ कोटींची वसुली

जालना : प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांसाठी शनिवारी आयोजित लोकअदालतीत एकूण २३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात मावेजा व दंडाचे असे एकूण १४ कोटी ७ लाख ४७ हजार ३०० रुपये वसूल झाले.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश रा.वि. देशमुख होते. उदघाटक म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष कैलास रत्नपारखे व सरकारी वकील मुकुंद कोल्हे होते. यावेळी १४ कोटी ७ लाख १० हजारांचा मावेजा तर ३७ हजार ३०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले.
लोकअदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे ३, कलम १३८ एन.आय. अ‍ॅक्ट ची २३, प्रलंबित दिवाणी प्रकरणे २५, फौजदारी प्रकरणे २०, दावा दाखल पूर्व प्रकरणे मोटार वाहन कायद्याअंतर्गत प्रकरणे ८४ अशी प्रकरणे निकाली काढण्यात आली.
यावेळी जिल्हा न्यायाधीश के.के. गायकवाड, ए.एन. करमरकर, निरंजन नाईकवाडे, व्ही.एस. देशपांडे, आर.पी. परदेशी, एस.टी. कटारे, एस.बी. जोशी, मुंगीलवार, आर.आर. तेहरा, भाटिया, व्ही.पी. फडणवीस, सी.पी. शेळके, सुपेकर, ज्ञानेश्वर वाघ, ए.व्ही. वायाळ यांच्यासह गोविंदप्रसाद मुंदडा, बी.एम. साळवे, जे.सी. बडवे, आर.बी. पडोळ, एस.ए. कुलकर्णी, दीपक नाईक, एस.एम. कुलकर्णी, रोशन गोलेच्छा, महेंद्र साळवे, कल्पना त्रिभुवन, तिडके आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक एफ. एम. खॉजा यांनी केले. यावेळी अधीक्षक पांचाळ, शेजवळ, दाभाडकर, कुलकर्णी, गडदे, उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Recovery of public money collection of 14 crores