परभणीतून चौघांच्या नावाची शिफारस
By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:56:31+5:302014-08-23T00:45:24+5:30
परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या २४ जणांच्या मुंबई येथे मुलाखती घेण्यात आल्यानंतर त्यामधून चार जणांची नावे पक्षश्रेष्ठींकडे शुक्रवारी पाठविण्यात आली

परभणीतून चौघांच्या नावाची शिफारस
परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या २४ जणांच्या मुंबई येथे मुलाखती घेण्यात आल्यानंतर त्यामधून चार जणांची नावे प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पक्षश्रेष्ठींकडे शुक्रवारी पाठविण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
परभणी विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातून २७ जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यापैकी २४ जणांनी १९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मुलाखती दिल्या. मुलाखती देण्यासाठी झालेल्या भाऊगर्दीमुळे वरिष्ठ नेतेही चकित झाले होते. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी इच्छुकांना कानपिचक्याही दिल्या होत्या. २४ पैकी ४ जणांची निवड करण्याचे सूचविले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवार निवड समितीने २४ पैकी ४ उमेदवारांची नावे दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहेत. उमेदवाराची अंतिम निवड दिल्ली ेयेथूनच केली जाणार आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आलेल्या चार नावांमध्ये काही अनपेक्षित नावांचा समावेश आहे. त्यामुळे या चार इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल, या विषयीची उत्सुकता जिल्हावासियांना लागली आहे. अनेक दिग्गज इच्छुकांची नावे या यादीतून वगळली गेली असल्याचे समजते. परभणीतून उमेदवारी देत असताना संपूर्ण मराठवाड्याचा विचार पक्षश्रेष्ठींकडून केला जाणार असल्याची माहिती मुंबई येथील विश्वसनीय सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या उमेदवारानंतर शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)