शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बेफाम कारचालकाने वृद्ध सुरक्षारक्षकाला चिरडले, हातपाय तुटून मेंदूच बाहेर पडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:47 IST

शेकोटीजवळ बसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर थेट कार घालून अक्षरश: चिरडून पुढे फरपटत नेले.

छत्रपती संभाजीनगर : बेफाम कारचालकाने रस्त्याच्या कडेला शेकोटी जवळ बसलेल्या वृद्धाला चिरडले. या अपघातात वृद्धाचे हात व पाय धडावेगळे होऊन थेट मेंदूच डोक्याबाहेर पडला. अपघातानंतर चालक पसार झाला. रमेश शंकरलाल अग्रवाल (७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

मुकुंदवाडीत राहणारे रमेश अग्रवाल हे बीड बायपासवरील गांधेली फाट्याजवळ सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. मुसळधार पाऊस पडून गेल्याने थंड वारे सुरू होते. त्यामुळे रमेश रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवून बसले होते. रात्री १२:३० वाजेच्या सुमारास झाल्टा फाट्याकडून देवळाईच्या दिशेने संजय शिवाजी राठोड (३६, रा. परदरी तांडा) हा कारने सुसाट वेगात जात होता. शेकोटीजवळ बसलेल्या रमेश यांच्या अंगावर त्याने थेट कार घालून अक्षरश: चिरडून पुढे फरपटत नेले. आपल्याकडून अपघात झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड पळून गेला. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेतहा अपघात इतका भीषण होता की, शेकोटीजवळ बसलेल्या रमेश यांच्या अंगावरच थेट कार गेल्याने यांचा डावा हात कोपऱ्यापासून वेगळा झाला. तर उजवा पाय मांडीपासून तुटून बाजूला झाला. संपूर्ण डोके, चेहरा चिरडले जाऊन मेंदू बाहेर पडला. रमेश यांच्या मुलाच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात राठोडवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार विष्णू मुंढे तपास करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी