स्मार्ट सिटी योजनेत ४९ कोटी रुपये प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:42+5:302020-11-12T07:28:42+5:30

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनला ४९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ...

Received Rs. 49 crore in Smart City Scheme | स्मार्ट सिटी योजनेत ४९ कोटी रुपये प्राप्त

स्मार्ट सिटी योजनेत ४९ कोटी रुपये प्राप्त

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनला ४९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. दिवाळीनंतर आणखी १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाल्यानंतर गेल्या चार वर्षांत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनने शहर बससेवा, एमएसआय, सफारी पार्क विकसित करणे, शहरातील ऐतिहासिक दरवाजांच्या सुशोभीकरणासह अन्य कामे हाती घेतली आहेत. सध्या सुमारे २५० कोटींची कामे शहरात सुरू आहेत, तर प्रकल्पांची किंमत सुमारे ७०० कोटी रुपये आहे. काही प्रकल्पांची सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून पुढील टप्प्यातील निधी मिळावा यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनतर्फे पाठपुरावा सुरू होता. तिसऱ्या टप्प्यात नुकताच ४९ कोटींचा निधी केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांनी सांगितले. स्मार्ट योजनेंतर्गत आतापर्यंत २९४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यात राज्य शासनाचा हिस्सादेखील लवकरच मिळेल. त्यानंतर पुन्हा ४९ कोटी रुपये व २५ टक्के राज्य शासन हिस्सा असे येत्या काळात सुमारे १०० कोटी रुपये स्मार्ट सिटीसाठी मिळतील, असे पुष्कल शिवम् यांनी नमूद केले.

---------------

Web Title: Received Rs. 49 crore in Smart City Scheme