शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या कामांचे मनपाकडून पुनर्विलोकन

By admin | Updated: December 18, 2015 00:16 IST

औरंगाबाद : मंजुरीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आतापर्यंत सुरुवात न झालेल्या विकासकामांचे आता महानगरपालिकेकडून पुनर्विलोकन होणार आहे.

औरंगाबाद : मंजुरीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आतापर्यंत सुरुवात न झालेल्या विकासकामांचे आता महानगरपालिकेकडून पुनर्विलोकन होणार आहे. प्रभारी आयुक्तांनी अशा सर्व कामांची यादी तात्काळ सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यादीच्या छाननीनंतर अत्यावश्यक वाटतील तेवढीच कामे कायम ठेवली जाणार असून, उर्वरित कामांना मात्र फाटा दिला जाणार आहे. त्यामुळे सुमारे २० कोटी रुपयांची कामे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. महानगरपालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केली जातात; परंतु गेल्या काही वर्षांत पालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सर्वच कामांना निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी काही मंजूर कामे तशीच राहतात. अशा कामांची संख्या खूप आहे. आता या कामांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे मंजूर तरतुदीत ही कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे या कामांचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्तांनी घेतला आहे. त्याबाबत आयुक्तांनी सर्व विभागांकडून सुरू न झालेल्या मंजूर कामांची यादी मागविली आहे. ज्या कामांना मंजुरी मिळून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे; परंतु त्यांना आतापर्यंत सुरुवातही झालेली नाही अशाच कामांची यादी सादर करण्याच्या सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या कामाचा खर्च खूपच वाढलेला असेल आणि आजच्या परिस्थितीत त्या कामावर तेवढा खर्च करणे परवडणारे नसेल तर तशी कामेही रद्द करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. सद्य:स्थितीत मंजूर कामांपैकी एकूण ७० कोटी रुपयांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणे बाकी आहे. त्यातील किमान २० कोटी रुपयांची कामे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.