जुन्या शहरात पुन्हा पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:56 IST2017-08-28T00:56:06+5:302017-08-28T00:56:06+5:30

महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रात मागील काही दिवसांपासून सतत विघ्न निर्माण होत आहे. रविवारी दुपारी नक्षत्रवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला.

Rebirth in the old city | जुन्या शहरात पुन्हा पाणीबाणी

जुन्या शहरात पुन्हा पाणीबाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रात मागील काही दिवसांपासून सतत विघ्न निर्माण होत आहे. रविवारी दुपारी नक्षत्रवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. वीज यंत्रणेतील दोष शोधून काढण्यासाठी वीज वितरण कंपनीला तब्बल ७ तास लागले. त्यामुळे जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बंद पडली. रात्री ७.४५ वाजता पाणीपुरवठा सुरळीत झाला. उद्या जुन्या शहरातील अनेक वॉर्डांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Rebirth in the old city