मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणारच कारण,' मोदी है तो मुमकिन है'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 04:16 PM2019-09-07T16:16:52+5:302019-09-07T16:17:24+5:30

६४ हजार किलोमीटर पाईपलाईनने साकारणार 'वॉटरग्रीड'

The reason for the drought in Marathwada will end, 'Modi hai to mumkin hai' | मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणारच कारण,' मोदी है तो मुमकिन है'

मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणारच कारण,' मोदी है तो मुमकिन है'

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी येथे वॉटरग्रीडच्या माध्यमातून काम सुरु आहे. यातील औरंगाबाद आणि जालना येथे ग्रीडच्या निवडा निघाल्या आहेत. अनेकजण विचारतात यासाठी खूप पैसा लागेल हे कस शक्य आहे. मात्र, मराठवाडा दुष्काळ मुक्त होणारच कारण, 'मोदी है तो मुमकिन है' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते ऑरिक सिटी लोकार्पण आणि महिला बचत गट मेळाव्यात बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना हे आता औद्योगिक चुंबक म्हणून जागतिक स्तरावरील उद्योगांना आकर्षित करत आहेत. येणाऱ्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होईल. तसेच मागील चार वर्षांपासून मराठवाड्यातील दुष्काळ वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नष्ट होईल. यासाठी ६४ हजार किलोमीटरची पाईपलाईन टाकून कोकणातून पाणी आणण्यात येईल. या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक खेड्यात फिल्टरचे पाणी येईल असेही ते यावेळी म्हणाले.

५० औद्योगिक पार्क मध्ये ३० टक्के जागा बचत गटांना राखीव ठेवले आहेत. बचत गटांना दिलेला पैसा १०० टक्के परत येतो. बचत गटांसाठी ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

Web Title: The reason for the drought in Marathwada will end, 'Modi hai to mumkin hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.