शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

शिवसेनेच्या पराभवाची कारणमीमांसा सेना भवनातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 6:12 PM

फोनवरून संपर्क करून पराभवाच्या कारणांचा शोध 

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू

औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थापनेपासून लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत मनपा विरोधी पक्षनेते, आमदार आणि खासदार, असा ३१ वर्षांचा राजकीय प्रवास करून अभेद्य बालेकिल्ल्याचे शिलेदार असलेले माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी खैरे यांना कमी मतांनी पराभवाची धूळ चारली. शिवसेनेचे मराठवाड्यातील इतर उमेदवार निवडून आले; परंतु औरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला असून, पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे खा. जलील यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झालेले शिवसेना उमेदवार खैरे यांच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शिवसेना भवनातून काही पदाधिकाऱ्यांना फ ोनवरून विचारणा होऊ लागल्याची माहिती हाती आली आहे. काही प्रश्नांची उत्तरे संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असून, त्याआधारे आगामी काळात विश्लेषण करून मतदारसंघाबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचा पहिल्यांदाच जिल्ह्याच्या राजकारणात पराभव झाल्यामुळे पक्षाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. मराठवाड्यात पक्षाच्या किती जागा आल्या, यापेक्षा मराठवाड्याच्या राजधानीत पराभव झाल्यामुळे पक्षाने पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडल्याचा, पक्षांतर्गत गटबाजी आणि अ‍ॅन्टी इन्कम्बंसी फॅक्टरमुळे खैरेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीदेखील हातचे राखून काम केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार जाधव यांना आतून मदतीचा हात दिल्याचा आरोप सेनेतील एका गटातून होतो आहे.

असे प्रश्न विचारण्यात येत आहेत४पक्षांतर्गत गटबाजी, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुणाचे काम केले, फेरबदल करण्याची गरज आहे काय? शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते का? त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले की, इतर कुणाचे, मित्रपक्ष भाजपने काय काम केले. अपक्ष उमेदवारामुळे मतदान का विभागले, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत तुमचे मत काय?४यासारखे काही प्रश्न पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असल्याची माहिती समजली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, निवडणुकीच्या कामात जे पदाधिकारी थेट कार्यरत होते त्यांना व उर्र्वरित प्रचार यंत्रणेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवनातून संपर्क होत असल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील