विद्यापीठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:24+5:302020-11-28T04:07:24+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवारी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, तसेच २६ नोव्हेंबर ...

विद्यापीठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवारी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले, तसेच २६ नोव्हेंबर २००६ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ व कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची मंचावर उपस्थिती होती. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन व संविधान वाचन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजीब खान, डॉ. टी.आर. पाटील यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी सहभागी झाले.