सर्वसामान्यांच्या बजेटविषयी प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:34+5:302021-02-05T04:17:34+5:30
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना रिटर्न दाखल करण्यातून मिळालेली सूट, एवढाच काय तो ज्येष्ठ नागरिकांबाबत बजेटमध्ये विचार केलेला दिसतोय. ही मर्यादा ...

सर्वसामान्यांच्या बजेटविषयी प्रतिक्रिया
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना रिटर्न दाखल करण्यातून मिळालेली सूट, एवढाच काय तो ज्येष्ठ नागरिकांबाबत बजेटमध्ये विचार केलेला दिसतोय. ही मर्यादा ६५ वर्षांपर्यंत खाली आणायला हवी होती. यासोबतच ज्येष्ठांच्या आरोग्याचाही विचार व्हायला पाहिजे होता. कारण या वयात ज्येष्ठांना सर्वांत जास्त गरज आहे ती वैद्यकीय उपचार आणि त्यासाठीच्या सुलभ मेडिक्लेम पाॅलिसीची. त्याबाबत या बजेटमध्ये काही विचार झाल्याचे दिसून आले नाही.
- शिवकुमार पाडळकर,
ज्येष्ठ नागरिक.
२. बजेट पाहिलेच नाही
दरवर्षीच बजेट सादर होते. बजेट सादर झाल्याने किंवा त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे आम्हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर कोणताच मोठा परिणाम होत नाही. दैनंदिन कामाच्या चक्रात बजेट पाहायला वेळच मिळालेला नाही.
- सागर पुंड, भाजीविक्रेते
३. आशादायी प्रयत्न
कोरोना लसीकरणाला दिलेले प्राधान्य आणि आरोग्य सेवांवर दिलेला भर यामुळे प्रत्येकाच्याच आरोग्याची काळजी बजेटमध्ये घेतली आहे, असे दिसून येते. याशिवाय सर्वसामान्य लोक, शेतकरी, महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरणावर दिलेला भरही या बजेटमधून दिसून येतो. आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करण्याचा आशादायी प्रयत्न बजेटमधून केलेला आहे.
- प्रीती झंवर, गृहिणी