सात महिला बचत गटांना रेशन दुकान
By Admin | Updated: June 10, 2014 00:16 IST2014-06-10T00:08:46+5:302014-06-10T00:16:10+5:30
अर्धापूर : तालुक्यातील सात गावांतील महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला असून आता लवकरच त्या महिला बचत गटातर्फे लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करणार आहेत़

सात महिला बचत गटांना रेशन दुकान
अर्धापूर : तालुक्यातील सात गावांतील महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला असून आता लवकरच त्या महिला बचत गटातर्फे लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करणार आहेत़
तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही़ एऩ घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ११ गावांच्या महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते़ त्यापैकी लहान येथील प्रज्ञाशील करूणा महिला बचत गट, कारवाडी येथील जय जिजाऊ, वाहेदपूर येथील जय दुर्गा, निजामपूर येथील महारूद्र, कलदगाव येथील जय जिजाऊ, खडकी येथील सावित्रीबाई व देळूब खुर्द येथील सावित्रीबाई फुले या सात गावांच्या महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानांचा परवाना मंजूर झाला़ त्यानुसार ६०० रुपये परवाना फीस संबंधित महिला बचत गटांनी चलनाद्वारे बँकेत भरणा केली आहे़
महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळण्याचा प्रथम मान अर्धापूर तालुक्याला मिळाला असून लवकरच महिला बचत गटामार्फत स्वस्त धान्याचे वाटप सुरू होईल, अशी माहिती विस्तार अधिकारी सुनील मोटरवार यांनी दिली़ (वार्ताहर)