फळ-भाज्यांमध्ये वाढले पेस्टीससाईडसचे प्रमाण
By Admin | Updated: September 1, 2014 00:24 IST2014-09-01T00:16:43+5:302014-09-01T00:24:00+5:30
नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़

फळ-भाज्यांमध्ये वाढले पेस्टीससाईडसचे प्रमाण
नांदेड: देशातील लोकसंख्या वेगाने वाढल्याने अन्नाचे उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झले़ त्यासाठी बियाणांना हायब्रिड करण्याचा प्रयत्न झाला़ अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढल्याने देश व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली़ नवीन वाण बाजारात आले त्याचे उत्पादन विक्रमी झाले़ यातच वातावरणाने कुस बदलल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढला़ हायब्रिड वाणात रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ लागली़ आता तर विषाक्त फवारणीची सवयच जडली असून रोज आपण बाजारातून घरी आणलेली भाजी आणि फळेही विषाक्त होत आहेत़ याचे दुष्परिणाम आता ठळकपणे दिसायला लागले आहेत़ त्यामुळेच आधी सर्व पिकांवर फावरणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत़
आजारांचे प्रमाण वाढले
शहरांचा गतीने विकास होत गेला़ या वाढत्या शहराची भूक भागवण्यिाची जबाबदारी शेतकऱ्यांवर आली़ यातून मिळणारा अधिकाधिक फायदा दिसून लागल्याने उत्पादनवाढीची कसरत सुरु झाली़ खेड्यावरुन येणाऱ्या भाजीपाल्याची क्रेझ वाढली़ परंतु हा भाजीपाला शहरी बाजारात टिकवून ठेवण्यासाठी रसायनांची मदत घेतली जाऊ लागली़ परिणामी शहरात आजराचे प्रमाण वाढत गेले़
आता आॅरगॅनिक शेती
रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरुन अधिक फायदा व्हावा या संकल्पनेतून सेंद्रिय शेतीची पद्धत पुढे आली़ आता सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, यासाठी प्रयत्न सुरु आहे़ परंतु या खतामुळे होणारे फायदे आणि त्या संदर्भातील तंत्रज्ञान अद्यापही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत़ सेंद्रिय शेती म्हणजे काय संकल्पना आहे याची जाणीव करुन देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे़
कृषी संशोधनावर दरवर्षी कोट्यवधीचा खर्च होतो़ परंतु यातून होणारे संशोधन, त्याचे फायदे व तोटे सांगण्याची गरज कुणालाच वाटत नाही़ काही वर्षात कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर वाढला़ हायब्रिड बियाणामुळेही समस्या निर्माण झाल्या़ जमिनीचा कस कमी झाला़ आता तर मानवी शरीरात कीटकांना संपविणाऱ्या रसायनांचा स्तर वाढल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत़ (प्रतिनिधी)