शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'मराठवाड्यासाठी पाणी सुटेपर्यंत रास्तारोको सुरूच राहणार';आक्रमक आंदोलनाने जालना रोड ठप्प

By बापू सोळुंके | Updated: November 20, 2023 13:42 IST

जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी रोखून धरले आहे. यामुळे मराठवाड्यातील जनतेमध्ये संताप आहे. आज सकाळी सिंचन भवनसमोर जालना रोडवर हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी सर्वपक्षीय रस्तारोको करण्यात येत आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संघटना सहभागी झालेल्या या रस्तारोकोने जालना रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. 

यावेळी जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला. आंदोलनात सहभागी नेत्यांची पाणीप्रश्नावर एकजूट दिसून आली. या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाठ, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे ,अण्णासाहेब माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार किशोर पाटील ,माजी आमदार नामदेव पवार, अमरसिंह पंडित,  बदामराव पंडित, माजी महापौर नंदकूमार घोडेले, उद्योजक अर्जुन गायके, मसीआ संघटनेचे पदाधिकारी पाणी हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

मराठवाड्यातील जनतेला गृहीत धरू नयेयावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, मराठवाड्यातील जनतेला राज्य सरकारने गृहीत धरू नये. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय हे पाणी 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान सोडणे आवश्यक होते. मात्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकर्ते संचालकांनी 30 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन 20 दिवस उलटले तरी अद्याप 8.6 टीएमसी पाणी दिले गेले नाही.

आता शांत बसणार नाही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाण्याची गरज आहे. असे असताना अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मुद्दामहून आपले पाणी रोखून धरले याचा फटका गोरगरीब जनता शेतकरी उद्योजक यांना बसणार आहे. यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही, असा इशारा आमदार संजय शिरसाठ यांनी दिला. तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर मराठवाड्यातील एकाही आमदाराने हिवाळी अधिवेशनात सहभागी होऊ नये असे आवाहनही शिरसाठ यांनी घ्यावी केले. 

संयम सुटत चालला आहेअर्जुन खोतकर म्हणाले, मराठवाड्यातील जनता शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारी आहे. संतांच्या भूमितील असल्यामुळे आधी विनंती केली, निवेदने दिली परंतु, पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे आता आमचा संयम सुटत चालला आहे. जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद