शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राखी बांधल्यानंतर पाचव्याच दिवशी अल्पवयीन मुलीवर तरुणाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 6:19 PM

घटनेवेळी आरोपी मुलीला घेऊन जाताना पाहिलेल्या शेजारी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली.

ठळक मुद्देबलात्काराच्या पाच दिवसांपूर्वीच आरोपीने राखी बांधून घेतलीसुनावणीत ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेलेआरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

औरंगाबाद : इयत्ता सातवीतील मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या परिचित तरुणाला शुक्रवारी (दि.७) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. देशपांडे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा (नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप) आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षा झालेल्या तरुणाने पीडित मुलीकडून राखी बांधून घेतल्याच्या पाचव्याच दिवशी व त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

यासंदर्भात पीडितेने फिर्याद दिली होती की, १२ आॅगस्ट २०१७ रोजी तिचे आई-वडील बाहेरगावी गेले होते व भाऊ दहीहंडीच्या सरावासाठी बाहेर गेला होता. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ती घराच्या खाली आली. त्यावेळी तिचे काका-काकू जेवण करीत होते. आरोपीने इशारा करीत तिला बोलावले आणि तो राहत असलेल्या घराच्या गच्चीवर जबरदस्ती नेऊन जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे घटनेच्या पाच दिवसांपूर्वीच (दि.७ आॅगस्ट २०१७) आरोपीने पीडितेकडून राखी बांधून घेतली होती. तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, घडलेला प्रकार तिने सांगितला. मुलीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सुनावणीअंती न्यायालयालयाने आरोपीला  भा.दं.वि.च्या कलम ३६३ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व २,५०० रुपये दंड, कलम ३७६ (२)(ल) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप (नैसर्गिक मृत्यूपर्यंत) व १५ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व २,५०० रुपये दंड ठोठावला. आरोपीला ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ६ अन्वये दोषी ठरविण्यात आले; परंतु या कायद्यातील कलम ४२ मधील तरतुदीनुसार त्यासाठी वेगळी शिक्षा ठोठावली नाही. पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कोते यांनी तपास केला, तर पैरवी अधिकारी म्हणून यू.एच. तायडे यांनी काम पाहिले. अ‍ॅड. आहेर यांना अ‍ॅड. युवराज फुन्ने यांनी साहाय्य केले.

यांची साक्ष ठरली महत्त्वाचीखटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडित मुलीसह तिची आई, डॉक्टर तसेच घटनेवेळी आरोपी मुलीला घेऊन जाताना पाहिलेल्या शेजारी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप