केसापुरी येथे महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: May 24, 2014 01:33 IST2014-05-24T00:57:58+5:302014-05-24T01:33:59+5:30

बीड : तालुक्यातील केसापुरी परभणी येथे सरपणासाठी गेलेल्या ३२ वर्षीय महिलेवर वडवणी तालुक्यातील एका नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पुढे आली.

Rape of a woman at Kespuri | केसापुरी येथे महिलेवर बलात्कार

केसापुरी येथे महिलेवर बलात्कार

बीड : तालुक्यातील केसापुरी परभणी येथे सरपणासाठी गेलेल्या ३२ वर्षीय महिलेवर वडवणी तालुक्यातील एका नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पुढे आली. दिनकर तुकाराम वाघमारे (रा. साळींबा ता. वडवणी) असे त्या नराधमाचे नाव आहे. त्याला पिंपळनेर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेबाबत पोलीस म्हणाले, केसापुरी परभणी येथील ३२ वर्षीय महिला गुरुवारी सायंकाळी शेतामध्ये सरपण आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिला एकटीला पाहून दिनकर वाघमारे याने धमकावत बाजूला नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला जिवे मारण्याच्या धमक्या देत तेथून धूम ठोकली. त्यानंतर पीडित महिलेने घरी येऊन आपल्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक तिला घेऊन पिंपळनेर ठाण्यात दाखल झाले. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी लगेचच दिनकर वाघमारे याच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of a woman at Kespuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.