गुंगीचे औषध पाजून महिलेवर बलात्कार
By Admin | Updated: December 31, 2015 00:55 IST2015-12-31T00:52:00+5:302015-12-31T00:55:42+5:30
औरंगाबाद : ग्राहक महिलेला कॉफीतून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जयसिंगपुरा येथील एका किराणा दुकानदाराविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंगीचे औषध पाजून महिलेवर बलात्कार
औरंगाबाद : ग्राहक महिलेला कॉफीतून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जयसिंगपुरा येथील एका किराणा दुकानदाराविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आपले कृत्य झाकल्या जावे, यासाठी आरोपीने बलात्काराच्या घटनेचे मोबाईलवर चित्रण करून त्याची क्लिप तयार केली. ही क्लिप फेसबुक, व्हॉटस्अॅपसारख्या सोशल मीडियावर टाकून बदनामीची धमकी देऊन त्याने सतत सहा महिने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले.
अभिषेक पांडे (रा. जयसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे. बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे जयसिंगपुरा येथे किराणा दुकान आहे. पीडिता ही त्यांच्या दुकानातून किराणा सामान खरेदी क रीत असे. ५ जून रोजी आरोपी हा किराणा सामानाचे