रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड
By सुमेध उघडे | Updated: December 11, 2020 15:41 IST2020-12-11T15:28:00+5:302020-12-11T15:41:08+5:30
Agitation Against Raosaheb Danve in Aurangabad आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे.

रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड
औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी प्रहारच्या जलकुंभावरील ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन केली.
शेतकरी विरोधातील विधानावर माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर गुरुवारपासून आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी दुपारी आंदोलनस्थळी रावसाहेब दानवे यांचे जावई तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे. आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे. मात्र, हे सोडून शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचे हस्तक संबोधणे म्हणजे गावगुंडांप्रमाणे केलेले अक्कल शून्य व्यक्तव्य आहे. देशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणीही जाधव यांनी केली. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलकांना पाठिंबा देत जलकुंभावर आंदोलनस्थळी त्यांच्यासोबत जेवण सुद्धा केले.
दानवेंचे कर्तृत्व शून्य
रावसाहेब दानने यांचे कर्तुत्व पूर्णपणे शून्य आहे. आधी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आता प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळे ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे पुढे जातात तसे दानवे पुढे आले आहेत. एखाद्या गावागुंदाप्रमाणे सत्तेच अमरपट्टा असल्यासारखे त्यांचे वर्तन असते अशी टीकाही जाधव यांनी यावेळी केली.
रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलनhttps://t.co/js1YcsniCG
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) December 11, 2020