झटपट श्रीमंतीसाठी खंडणीचा मार्ग!
By Admin | Updated: April 7, 2015 01:29 IST2015-04-07T01:16:30+5:302015-04-07T01:29:57+5:30
औरंगाबाद : खडकेश्वर परिसरातील व्यापारी रवींद्र पांडे यांना सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार मिलिंद भीमराव पैठणे

झटपट श्रीमंतीसाठी खंडणीचा मार्ग!
औरंगाबाद : खडकेश्वर परिसरातील व्यापारी रवींद्र पांडे यांना सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार मिलिंद भीमराव पैठणे (३४, रा. कडी, धाड, बुलडाणा, सध्या जयभवानीनगर, गल्ली नंबर ८) याला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी अटक केली.
ौठणेचे काही नातेवाईक सिल्लोड तालुक्यात राहतात. येता जाता पैठणे नवनाथच्या धाब्यावर जेवणासाठी थांबत असे. तेथेच दोघांची ओळख आणि नंतर मैत्री झाली. पैठणेने नवनाथला ‘मी तुला ५० हजार रुपये देतो, तू फक्त मला तुझा मोबाईल वापरण्यासाठी द्यायचा’ असे सांगितले. पन्नास हजारांच्या आमिषाने नवनाथने मोबाईल दिला आणि मग त्या मोबाईलवरून पैठणेने पांडे यांना खंडणीसाठी धमकावल्याचे तपासात समोर आले आहे.