रांजणगावच्या शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण?
By Admin | Updated: December 27, 2014 00:47 IST2014-12-27T00:43:07+5:302014-12-27T00:47:28+5:30
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून एका १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण केल्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.

रांजणगावच्या शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण?
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून एका १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण केल्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. या अपहरणप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिलेली माहिती अशी की, सोमारू कपूरचंद सोनी (५०, रा. पलईपट्टी, ता.जि. बनारस, उत्तर प्रदेश, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी) हे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत ठेकेदारामार्फत काम करतात. रांजणगावातील पवननगर येथे सोमारू सोनी हे पत्नी, तीन मुले व एक मुलगी, असे कुटुंबियांसह राहतात. त्यांचा मुलगा शिवम सोनी (१३) हा रांजणगावातील राजमाता जिजाबाई शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो.
नातेवाईक व मूळ गावी चौकशी करूनही शिवमचा शोध लागत नसल्यामुळे त्याचे वडील सोमारू सोनी यांनी आज एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मुलाचे कुण्यातरी व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिली आहे.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार वसंत शेळके करीत आहेत. याविषयी राजमाता शाळेचे किसन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता शिवम हा शाळेत सतत गैरहजर राहत असल्याचे सांगत घटनेच्या दिवशी तो शाळेत आला नसल्याचे सांगितले.