रामदास कदम औरंगाबादचे पालकमंत्री

By Admin | Updated: December 27, 2014 00:48 IST2014-12-27T00:35:13+5:302014-12-27T00:48:01+5:30

औरंगाबाद : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने सेनेने पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले आहे.

Ramdas Kadam Aurangabad Guardian Minister | रामदास कदम औरंगाबादचे पालकमंत्री

रामदास कदम औरंगाबादचे पालकमंत्री

औरंगाबाद : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने सेनेने पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले आहे. भाजपाला यानिमित्ताने मोठा शह बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील राजकारणातही कदम यांचा प्रभाव राहील, असे सेनेच्या काही नेत्यांचे मत आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे ३, भाजपाचे ३ आमदार आहेत. सभापती हरिभाऊ बागडे वगळता कुणालाही लालदिवा मिळाला नाही. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक तिघांपैकी एकाला मंत्रीपद मिळेल आणि पालकमंत्री म्हणून वर्णी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही.
गंगापूरचे आ. प्रशांत बंब, शहरातील पूर्व मतदारसंघातील अतुल सावे, विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे हे भाजपाचे, तर पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव, पैठणचे आ. संदीपान भुमरे यांच्यापैकी सावे, शिरसाट, बंब यांची नावे चर्चेत होती. यापैकी एकाचीही वर्णी मंत्रिमंडळात लागलेली नाही.

Web Title: Ramdas Kadam Aurangabad Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.