मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: August 6, 2014 02:29 IST2014-08-06T01:03:46+5:302014-08-06T02:29:45+5:30
उस्मानाबाद : मागण्यांसाठी मातंग समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
उस्मानाबाद : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, लहुजी वस्ताद साळवे यांचा दिल्ली येथील संसदभवन व मुंबई येथील विधानभवनासमोर पुर्णाकृती पुतळा बसवावा, या व इतर मागण्यांसाठी मातंग समाज बांधवांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
लहुजी शक्ती सेनेचे नेते विष्णू कदम ३१ जुलै पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी शासनाने अद्यापही या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे सांगत, सरकारच्या भूमिकेचा यावेळी निषेध करण्यात आला.
या मोर्चामध्ये सोमनाथ कांबळे, कानिफनाथ देवकुळे, पिंटू चांदणे, पूजा देडे, शिवाजी गायकवाड, सचिन लांडगे, दत्ता पेटे, रामरतन कांबळे, बालाजी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य करून विष्णू कसबे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी विविध संघटनेच्या सहभागी पदाधिकाऱ्यांनी दिला. (प्रतिनिधी)