लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अपंग पुनर्वसन कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अपंग व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.दुपारी बारा वाजता गांधीचमन चौकातून मोर्चास सुरुवात झाली. रेल्वेस्टेशन, उड्डाणपूल, अंबड चौफुली मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण व इतरांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले.अपंगांचे मानधन सहाशेवरून चार हजार रुपये करावे, सर्व अपंगांना घरकुल योजनेचा सरसकट लाभ द्यावा, जिल्ह्यात शिक्षण घेणाºया सर्व अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करून वसतिगृहाची व्यवस्था करावी, अपंगत्त्वाचा आॅनलाइन दाखला सात दिवसांत देण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात अपंग निवारा भवन स्थापन करण्यात यावे, शासकीय कार्यालयात अपंगांसाठी स्वतंत्र कक्ष व लिफ्टची सुविधा करण्यात यावी आदी मागण्या या वेळी मोर्चेकºयांनी केल्या. संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना दिले
अपंगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:44 IST