रिक्षाचालकांचा मागण्यांसाठी मोर्चा

By Admin | Updated: December 23, 2014 00:28 IST2014-12-23T00:28:00+5:302014-12-23T00:28:00+5:30

औरंगाबाद : रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी भडकलगेटहून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजता मोर्चा दाखल झाला

A rally for the demands of rickshaw pullers | रिक्षाचालकांचा मागण्यांसाठी मोर्चा

रिक्षाचालकांचा मागण्यांसाठी मोर्चा


औरंगाबाद : रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी भडकलगेटहून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजता मोर्चा दाखल झाला. संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चार वाजता आरटीओ अधिकारी आणि संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास होणारी कारवाई व दंडाबाबत आश्वासन देण्यात आल्याने सायंकाळी पाच वाजता बंद मागे घेण्यात आल्याची माहिती रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीचे निसार अहमद खान यांनी दिली. यावेळी एस.के. खलील, श्रावण कदम, मिलिंद मगरे, अनिल मोगले, राजू देहाडे, दगडू शहाणे, जब्बार खान, शेख नजीर अहेमद आदींची उपस्थिती होती.
पोलीस आयुक्तांच्या वाहनास घेराव
भडकलगेट येथे मोर्चासाठी जमलेल्या रिक्षाचालकांनी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा अडवून चालकांशी वाद घातला. प्रवाशांना उतरविण्यासाठी मोर्चेकरी वाद घालत असता पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलीस आयुक्त या ठिकाणाहून जात असताना मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या वाहनास घेराव घातला.

Web Title: A rally for the demands of rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.