अनाथलयातील रक्षाबंधन...
By Admin | Updated: August 10, 2014 02:01 IST2014-08-10T01:53:47+5:302014-08-10T02:01:00+5:30
गजानन वानखडे जालना येथील कै़राधाबाई अनाथालयातील २०० अनाथ बालकांना पारीख गु्रपच्या वतीने राखी बांधून ‘तुम्ही अनाथ नाहीत’ असा संदेश देण्यात येणार आहे़

अनाथलयातील रक्षाबंधन...
गजानन वानखडे जालना
येथील कै़राधाबाई अनाथालयातील २०० अनाथ बालकांना पारीख गु्रपच्या वतीने राखी बांधून ‘तुम्ही अनाथ नाहीत’ असा संदेश देण्यात येणार आहे़
येथील कै़ राधाबाई अनाथालयात एकूण २०० अनाथ बालकांना अनेक सणापैकी रक्षाबंधन हा बहिण भावाच्या प्रेमळ बंधनाच्या सणाला येथील बालके आपल्या बहिणीच्या आठवणीने व्याकूळ होतात. दरवर्षी ते या सणाची आतुरतेने वाट पाहतात. कारण येथील अनेक बालकांचे आई-वडील हयात नाहीत. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे बहिण देखील आपल्याला राखी बांधायला येत नसल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते़ परंतु शहरातील अनेक गृपच्या महिलांनी या विद्यार्थ्यांना राखी बांधत असल्याने आम्हाला आमच्या बहिणीची आठ़वण येते, अशी प्रतिक्रियाही काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आम्ही या सणाची दिवाळीपेंक्षाही आतुरतेने वाट पाहत असल्याचे सचिन खरात या बालकाने सांगितले. आम्हाला बहिणीचे काय नाते असते ते आम्हाला राखी बांधल्यावरच कळते कारण असे प्रेमाने ओवाळून पेढा चारणे आम्ही कधी बघितलेच नाही. त्यामुळे गेल्या वर्षी जैन विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आम्हाला राखी बांधली होती. तेंव्हा आम्हाला बहिणीचे एक दिवस का होईना, बहिणीचे प्रेम बघायला मिळते.
आकाश आव्हाड या विद्यार्थ्याने शहरातील विविध संस्था, संघटना आम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधत असल्याने आम्हाला एक दिवस का होर्इृना बहिणीचे पे्रम मिळते आणि आपलीच बहिण असल्यासारखे वाटते़ आम्ही आज सकाळी रक्षाबंधनानिमित्त टिव्हीवर बहिण- भावाचे नाते सांगणारा चित्रपट पाहात होतो, असेही आकाश म्हणाला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.