राकाँ जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा राजीनामा

By Admin | Updated: March 20, 2017 22:41 IST2017-03-20T22:39:30+5:302017-03-20T22:41:23+5:30

बीड : राकॉचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी रविवारी रात्री जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला.

Rakha District President Bharath Bhushan Kshirsagar resigns | राकाँ जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा राजीनामा

राकाँ जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा राजीनामा

बीड : राकॉचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी रविवारी रात्री जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती सभापती निवडी दरम्यान राकॉने जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेताच दोन वेगवेगळे व्हिप बजावले होते. ही बाब डॉ. क्षीरसागर यांच्या जिव्हारी लागली होती. यावरून नाराज होत त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यावरून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रीया आहे. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या प. स. निवडणुकीमध्ये डॉ. क्षीरसागर यांचे पुतने संदिप क्षीरसागर यांनी बंडाचे निशान उभारले होते. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी तीन वर्षापूर्वी राकॉच्या अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत बंडाळीला वैतागून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rakha District President Bharath Bhushan Kshirsagar resigns