राजीव गांधी आवासमधून उस्मानाबादेत ६००० घरकुले

By Admin | Updated: July 1, 2014 01:04 IST2014-07-01T00:19:30+5:302014-07-01T01:04:28+5:30

उस्मानाबाद : राजीव गांधी आवास योजनेतून शहरातील १० झोपडपट्टी भागाचा (स्लम) कायापालट होणार असून, जवळपास ६ हजार घरकुले उभा करण्यात येणार आहेत़

From the Rajiv Gandhi residence, 6000 houses in Osmanabad | राजीव गांधी आवासमधून उस्मानाबादेत ६००० घरकुले

राजीव गांधी आवासमधून उस्मानाबादेत ६००० घरकुले

उस्मानाबाद : राजीव गांधी आवास योजनेतून शहरातील १० झोपडपट्टी भागाचा (स्लम) कायापालट होणार असून, जवळपास ६ हजार घरकुले उभा करण्यात येणार आहेत़ या दहा भागातील लाभार्थ्यांचा डोअर-टू-डोअर सर्वे सुरू असून, सर्वेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी नगर पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी केले़
उस्मानाबाद शहरात यापूर्वी आयएचएसडीपी घरकुल योजना राबविण्यात आली होती़ त्यात एका घरकुलासाठी केवळ ८० हजार रूपये निधी देण्यात येत होता़ मात्र, ही योजना बंद करून पालिकेने आता झोपडपट्टी निर्मूलनासाठी राजीव गांधी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे़
या योजनेंतर्गत शहरातील इंदिरा नगर, वडार गल्ली, आगड गल्ली, भोरे गलली, बौध्द नगर, आंबेडकर नगर, ख्वाजा नगर, भीमनगर, साठे नगर आदी परिसरात तब्बल ६ हजार घरकुले बांधण्यात येणार आहेत़ यात एका घरकुलासाठी २ लाख, ७५ हजार रूपये अनुदान देण्यात येत आहे़ तर त्या परिसरात रस्ते, पथदिवे, नाल्या आदी इतर सुविधा करण्यासाठी जवळपास एक लाख, २५ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे़ ही योजना राबविण्यासाठी लाभार्थ्यांचा सर्वे सुरू करण्याचे काम सुरू असून, अंतीम अहवाल २० जुलै पर्यंत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे़ त्यामुळे सर्वेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी नगर पालिकेत अर्ज करावेत, असे आवाहन यावेळी आ़ पाटील यांनी केले़ (प्रतिनिधी)
पाईपलाईनची कामे इतरांना देणार
शहरातील जुन्या पाईपलाईनला लिकेज असून, जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली कामे अनेक अडचणींमुळे बंद आहेत़ त्यामुळे ही कामे आता एमजीपी ऐवजी इतरांकडून करून घेण्यात येणार आहेत़ उजनी योजनेसाठी स्टॅन्डबाय मोटार विकत घेण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी केले़
...तर कारवाई होणार
शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद असल्याचे मान्य करताना पाटील म्हणाले, पथदिव्यांची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने काही उपाय हाती घेतले आहेत़ दुरूस्तीसाठीचे टेंडर प्रक्रिया काढण्यात येणार असून, दोन दिवस पथदिवे बंद राहिल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे़ ही प्रक्रिया पूर्ण करताना आलेल्या गैरसमजुती दूर झाल्या असून, लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे़

Web Title: From the Rajiv Gandhi residence, 6000 houses in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.