- राजेंद्र दर्डा, एडिटर- इन- चीफलोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या अगदी २४ तास आधी मी दुबईत होतो. मरिना भागात मी राहिलो. बुर्जखलिफाच्या सावलीत फिरलो. अजित मुथियान व प्रकाश गंगवाल हे मित्रही सोबत होते. ज्या भागात राहिलो, फिरलो त्याच परिसरात इराणने आपले क्षेपणास्त्र डागले, असे लोकमतचे एडिटर- इन- चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
इंदूरचा पारिवारिक कार्यक्रम नसता, तर आम्ही दोन दिवस अधिक थांबणार होतो. तसे झाले असते तर तिथेच अडकलो असतो. २८ फेब्रुवारी रोजी म्हणजे ज्या दिवशी हे युद्ध सुरू झाले, त्याच दिवशी इंदूर येथे पारिवारिक कार्यक्रम नियोजित होता. त्यामुळे मी व माझे मित्र एक दिवस अगोदर दुबईहून परतलो. परतल्यानंतर काल शनिवारी मी टीव्हीवर पाहत होतो, मरिना (दुबई) परिसरात इराणने आपले मिसाईल डागले. त्याच ठिकाणी मी मुक्कामी होतो. बुर्जखलिफा या ठिकाणीही इराणने ड्रोन डागले, त्या ठिकाणीदेखील आम्ही भेट दिली होती. शनिवारी टीव्हीवर मी दुबाईतील दृश्य पाहिले, हृदय धडधडले, अंगावर शहारे आले. कदाचित इंदूरला कार्यक्रम नसता, तर आम्ही युद्धाच्या सावलीत दुबईतच अडकलो असतो हे निश्चित, असे राजेंद्र दर्डा म्हणाले.
Web Summary : Rajendra Darda, Lokmat's Editor-in-Chief, narrowly escaped the Dubai missile strike. He stayed in the Marina area, near Burj Khalifa, just before the Iran attack. A family event in Indore prompted his early departure, saving him from being stranded amidst the conflict.
Web Summary : लोकमत के एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा दुबई में मिसाइल हमले से बाल-बाल बचे। ईरान के हमले से ठीक पहले वे मरीना क्षेत्र में बुर्ज खलीफा के पास रुके थे। इंदौर में एक पारिवारिक कार्यक्रम ने उन्हें जल्दी निकलने के लिए प्रेरित किया, जिससे वे संघर्ष में फंसने से बच गए।