शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या अन् 5 हजार मिळवा, मनसेची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 19:59 IST

मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देमनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे.बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या अन् 5 हजार मिळवा अशी ऑफरच मनसेने दिली आहे. औरंगाबाद मनसेने घुसखोरांना पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ असं जाहीर केलं आहे.

औरंगाबाद -  बांगलादेशी आणि पाकिस्तानी हटाव या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहीम सुरू केली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आता बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या अन् 5 हजार मिळवा अशी ऑफरच मनसेने दिली आहे. 

औरंगाबाद मनसेने घुसखोरांना पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ असं जाहीर केलं आहे. आकाशवाणी चौकात मनसेने एक स्टॉल उभारला आहे. या स्टॉलवर घुसखोरांची गुप्तपणे माहिती द्यायची. माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. मात्र, घुसखोरांची माहिती खरी ठरल्यानंतरच माहिती देणाऱ्या व्यक्तिला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे. 

पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांची पुराव्या सहित माहिती दया आणि रोख 5000  मिळवा अशा आशयाच्या बॅनरसह एक स्टॉल मनसेने औरंगाबादमध्ये लावला आहे. राज ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी झालेल्या मनसेच्या अधिवेशनात पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोर यांना हकलून दया म्हणत आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. औरंगाबाद शहरात देखील घुसखोर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकांच्या घराशेजारी देखील असेच लोक राहत असतील म्हणून औरंगाबाद मनसेने ही योजना आखली आहे. 

जे नागरिक अशा प्रकारच्या घुसखोरांची माहिती पुराव्यानिशी देतील त्यांना मनसेतर्फे रोख 5000 रुपये देण्यात येणार आहेत. ही सर्व योग्य माहिती लगेच पोलिसांकडे पोहचवण्यात येईल आणि शहानिशा झालेल्या घुसखोरांना हकलण्यात येईल. जे नागरिक पुरावे देतील त्यांची नावे गुप्त राखण्यात येईल यासाठी मनसे मध्यवर्ती कार्यालय आकाशवाणी चौक येथे स्टॉल उभारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात आणखीन 5 ठिकाणी असे स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र

Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'

China Coronavirus : जगाला 'कोरोना'चा विळखा! आरोग्यमंत्र्यांनाच झाली लागण

Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'

Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी

Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादMNSमनसेPakistanपाकिस्तान