पावसाचे आगमन झाले अन् भाज्यांचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:48+5:302021-06-09T04:06:48+5:30
सर्वाधिक महाग झाले ते बीन्स, ते १५० ते २०० रुपये प्रति किलोने मिळत आहे. मागील आठवड्यात १०० ते १२० ...

पावसाचे आगमन झाले अन् भाज्यांचे भाव वधारले
सर्वाधिक महाग झाले ते बीन्स, ते १५० ते २०० रुपये प्रति किलोने मिळत आहे. मागील आठवड्यात १०० ते १२० रुपये किलो होते. ४० ते ५० रुपयांनी वधारून शेवग्याच्या शेंगा ८० ते १०० रुपये किलो विकल्या जात आहेत. दोडके ८० रुपये, शिमला मिर्ची ६० ते ८० रुपये, भेंडी ५० ते ६० रुपये, पत्ताकोबी ४० ते ५० रुपये प्रती किलो दराने विकत आहे. पावसाने पालेभाज्या खराब झाल्या. ज्या चांगल्या भाज्या आहेत त्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. पालेभाज्यात सर्वात जास्त मेथीची भाजी विकली जाते. मंगळवारी १५ रुपये गड्डी विकली जात होती. तर कोथिंबीर, पालक, चुका १० रुपये प्रति गड्डी विकली जात होती. संततधार पावसामुळे शेतात भाज्या खराब होऊन त्यानंतर काही दिवस भाज्यांचे भाव वाढतात. पावसाळ्यात कधी तेजी तर कधी मंदी असते. गणेशोत्सव, महालक्ष्मीच्या सणाला भाज्यांचे भाव सर्वाधिक वाढत असतात, अशी माहिती सागर पुंड यांनी दिली.
बाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंटकडून भाज्यांची मागणी वाढल्याने भाववाढ झाली हे सुद्धा एक कारण असल्याचे विक्रेते संदीप वाघ यांनी सांगितले.
चौकट
कांद्याला आला भाव
सध्या शेतकरी चांगल्या दर्जाचा कांदा चाळीत साठवून ठेवत आहेत. भाजीमंडईत दुसऱ्या व तिसऱ्या क्वॉलिटीचा कांदा विक्रीला येत आहे. मागील आठवड्यात १५ ते २० रुपये विक्री होणारा कांदा आज २५ ते ३० रुपये किलो विकला जात होता.