निलंगा तालुक्याला पावसाचा फटका
By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-07T23:53:17+5:302014-06-08T00:54:54+5:30
निलंगा : निलंगा शहर व परिसरात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

निलंगा तालुक्याला पावसाचा फटका
निलंगा : निलंगा शहर व परिसरात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून, या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, अनेक वृक्ष उन्मळून पडली़ तर अनेक ठिकाणचे पोल कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे़
७ जून रोजी रात्री १०़१५ वाजता वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला असल्याने सगळीकडे हाहाकार उडाला आहे़ लोअर तेरणा कॉलनीत घराशेजारील झाडे पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले़ पेठ, अशोकनगर भागातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले़ हालगरा, गुंजरगा, मानेजवळगा, सावरी, अनसरवाडा, बामणी, धानोरा आदी गावांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पावसाने रौद्र रूप धारण केले़ सोमवारी दोन तास झालेल्या पावसाची ८९ मि़मी़ नोंद झाली आहे़ याच पावसात केडिया दाल मिल निलंगा या उद्योगावरील पत्रे उडाले़ मशीन खराब झाल्या, भिंती पडल्या तसेच तुरीची दाळ भिजली़ यामध्ये एकूण २० लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद उद्योजक अनिल बोयतराम अग्रवाल यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिल्यावरून पोलिस निरीक्षक औदुंबर खेडकर यांनी सदरील उद्योगाचा पंचनामा केला़ तहसीलदार एऩडी़टिळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली व तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्याच्या सूचना संबंधित तलाठ्यांना तहसीलदारांनी दिले़