शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

ये..रे...ये...रे पावसा! मराठवाड्यात पाऊस बरसतोय, पण प्रकल्पात पाणी येईना

By विकास राऊत | Updated: June 18, 2024 19:50 IST

वार्षिक सरासरी ६७८च्या तुलनेत १३५ मि.मी. पडला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाऊस बरसत असला तरी मोठ्या, लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. विभागाच्या वार्षिक ६७८ मि.मी. सरासरीच्या तुलनेत आजवर १३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यांत किमान १७० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दि. १७ जून रोजी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत १३.१ मि.मी पाऊस झाला. यात बीड, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याचे पर्जन्यमापक आकडे सांगत आहेत.

मोठ्या धरणांत किती टक्के पाणी......जायकवाडी ५.३८ टक्केनिम्न दुधना ०.५९ टक्केयेलदरी २७.१७ टक्केसिद्धेश्वर.....०० टक्केमाजलगाव...०० टक्केमांजरा....०० टक्केपेनगंगा...२७.७२ टक्केमानार...-२२.२२ टक्केनिम्न तेरणा...१३.२५ टक्केविष्णुपुरी...१३.६५ टक्केसिना कोळेगाव...०० टक्केएकूण.............११.५९ टक्के

मराठवाड्याला यलो अलर्ट ....मराठवाड्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. विभागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

या अलर्टचा अर्थ काय?रेड अलर्ट.....मुसळधार पाऊस होणार असल्यास रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात येतो. यात पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

यलो अलर्ट ....वातावरणात बदल होणार असल्याचे यलो अलर्टद्वारे सांगण्यात येते. बाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी वातावरणाची खातरजमा करण्याचे संकेत यातून मिळतात.

ऑरेंज अलर्ट....या अलर्टमध्ये तुफान पाऊस होण्याचे संकेत देण्यात येतात. नागरिकांनी बाहेर पडताना सर्वतोपरी काळजी घेण्याची सूचना यातून करण्यात येते.

पावसाने का घेतला ब्रेक ....राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सर्व भागांत कमी-अधिक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे पावसाने ब्रेक घेतला आहे. तापमान वाढत असून, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे वातावरण दमट झाले असून, जनसामान्य घामाघूम होत आहेत.

विभागात आजवर झालेला पाऊसजिल्हा .........................पाऊसछत्रपती संभाजीनगर........१५४ मि.मीजालना .....             १५८ मि.मी.बीड............             १५१ मि.मी.लातूर..........             १८० मि.मी.धाराशिव.......... १७९ मि.मी.नांदेड.........             ६८ मि.मी.परभणी............ १२० मि.मीहिंगोली............ ८३ मि.मीएकूण................ १३५ मि.मी.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रDamधरण