शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ये रे.. ये रे.. पावसा ! मराठवाड्यात ढग नसल्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला विश्रांती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 17:49 IST

मराठवाड्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे४२०. मि. मी. आजवर पाऊस होणे अपेक्षित होते.६६ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नाही.

औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली असली तरी चार दिवसांतच प्रयोगाला ढगांअभावी विश्रांती घ्यावी लागली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी प्रयोग झाला नाही; परंतु विमानाचे उड्डाण यशस्वी झाले होते. दुसऱ्या दिवशी प्रयोगासाठी हव्या असलेल्या ढगांची गर्दी नसल्याने विमानाने उड्डाण भरले नाही. रविवारी पैठण, जालना, औरंगाबाद तालुक्यांतील काही भागांवर दोन विमान फिरले. एरोसोल्सने फवारणी केली. परंतु पाऊस होण्यावर त्याचा परिणाम झाला नाही. मराठवाड्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे. विभागात आजवर १२७.३१ मि.मी. पावसाची तूट आहे.

सोमवारी प्रयोग करण्यासाठी विमान उड्डाण घेईल, त्याचे काही परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु वैमानिकांनी सोमवारी विश्रांती घेतली. त्यामुळे सकाळी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांची बैठक झाली नाही. परिणामी उड्डाण होऊ शकले नाही. मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होऊन प्रयोगाबाबत निर्णय होणार आहे. सोमवारी विश्रांती घेतल्यामुळे आता मंगळवारी प्रयोग होणार असल्याचे विभागीय महसूल उपायुक्त सतीश खडसे यांनी सांगितले. ३० सप्टेंबरपर्यंत प्रयोगाच्या अनुषंगाने दररोज सकाळी ११ वाजता आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञांच्या बैठकी होतील. रविवारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुपारी दीड वाजता चिकलठाणा विमानतळावरून विमान उडाले. तीन तालुक्यांवर विमानाने मेघबीजरोपण (एरोसोल्स) केले. मात्र त्यातून किती पाऊस झाला, याची माहिती समोर आली नाही.

दमदार पावसाची अपेक्षा मराठवाड्यातील बहुतांश धरणे अजून मृतसाठ्यातच आहेत. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडी धरण ९० टक्के  भरले आहे.जायकवाडी वगळता मराठवाड्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे. मराठवाड्यावर वरुणराजाने वक्रदृष्टी केल्यामुळे ९ आॅगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. अजून तरी त्या प्रयोगातून काही हाती लागलेले नाही.७७९ मि.मि. विभागाची पावसाची सरासरी४२०. मि. मी. आजवर पाऊस होणे अपेक्षित होते.१२७.३१ मि.मी. पावसाची सध्या तूट आहे.२९२.८४ मि.मी. इतका पाऊस आजवर झाला आहे.६६ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नाही.३७.५ इतकाच पाऊस आजवर झालेला आहे

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण