कुपटा परिसरात पाऊस
By Admin | Updated: June 9, 2017 23:54 IST2017-06-09T23:52:41+5:302017-06-09T23:54:47+5:30
कुपटा: सेलू तालुक्यातील कुपटा परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.

कुपटा परिसरात पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपटा: सेलू तालुक्यातील कुपटा परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कुपटा गावाला जोडणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
कुपटा परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक वातावरणामध्ये बदल झाला. ढग दाटून आले व अचानक पाऊस सुरू झाला. काही वेळ जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाले व ओढ्याला पूर आला होता. वालूर गावाला जोडणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, ७ जून रोजी कुपटा परिसरात जोरदार पाऊस झाला होता. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतीच्या कामाला वेग आला आहे.