विविध ठिकाणी पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 2, 2016 23:20 IST2016-06-02T23:19:31+5:302016-06-02T23:20:52+5:30
हिंगोली : जिल्हाभरात विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे २ जून रोजी सायंकाळी हवेत थंडावा जाणवत होता.

विविध ठिकाणी पावसाची हजेरी
हिंगोली : जिल्हाभरात विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे २ जून रोजी सायंकाळी हवेत थंडावा जाणवत होता.
सेनगाव येथेही जोरदार पाऊस झाला असून, शहरातील नाल्यांना पाणी आले होते. मात्र कळमनुरी व आखाडा बाळापूर परिसरात रिमझीम पाऊस झाल्याने, गैरसोय निर्माण झाली होती. तसेच कुरुंदा येथे सायंकाळी ७ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तर जवळा बाजार परिसरातही रिमझिम पाऊस झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतीच्या कामांना गती येणार, हे मात्र नक्की. हिंगोलीत अर्धातास अवकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. तर वादळी वाऱ्याने वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. (प्रतिनिधी)