केवळ दोन मंडळात २० मिमीवर पाऊस
By Admin | Updated: July 12, 2016 00:54 IST2016-07-12T00:49:01+5:302016-07-12T00:54:08+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्वत्र रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असून,

केवळ दोन मंडळात २० मिमीवर पाऊस
उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्वत्र रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असून, सरासरी जिल्ह्यात केकवळ ८ मिमी पाऊस झाला़ तर केवळ शिराढोण (ताक़ळंब) मंडळात २४ मिमी व बेंबळी (ता़उस्मानाबाद) मंडळात २२ मिमी पाऊस झाला़ तर इतर १३ मंडळात १० मिमीवर पावसाची नोंद झाली़ इतरत्र अल्पपाऊस झाला असून, लोहारा तालुक्यातील जेवळी मंडळात पाऊस झाला नाही़
राज्यात विशेषत: विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात दमदार पावसाने हजेरी लावली आहे़ मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात मागील आठवड्यापासून केवळ ढगाळ वातावरण निर्मिती होत आहे़ मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस होवू लागला असला तरी तो पाऊसही अनेक मंडळात १० मिमीची सरासरीच्या आतच पडत आहे़ जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारीही ढगाळ वातावरण होते़ रविवारी दिवसभरात सर्वत्र रिमझिम झाली़ मात्र, त्याची केवळ ८ मिमी नोंद झाली आहे़ मंडळनिहाय आकडेवारी पाहता उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर मंडळात १६ मिमी, उस्मानाबाद ग्रामीण ५ मिमी, तेर २ मिमी, ढोकी ७ मिमी, बेंबळी २२ मिमी, पाडोळी ५ मिमी, जागजी ६ मिमी, तर केशेगाव मंडळात १६ मिमी पाऊस झाला़
तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर मंडळात ११ मिमी, सावरगाव ४ मिमी, जळकोट ५ मिमी, नळदुर्ग ८ मिमी, मंगरूळ २ मिमी, सलगरा १ मिमी पाऊस झाला़ उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरूम, दाळींब व नारंगवाडी मंडळात प्रत्येकी ५ मिमी पावसाची नोंद झाली़ तर मुळज मंडळात ६ मिमी पाऊस झाला़ लोहारा तालुक्यातील लोहारा व माकणी मंडळात प्रत्येकी ३ मिमी पाऊस झाला़ कळंब तालुक्यातील कळंब मंडळात १३ मिमी, इटकूर- १० मिमी, शिराढोण- २४ मिमी, येरमाळा ७ मिमी, मोहा- ३ मिमी, गोविंदपूर १३ मिमी पावसाची नोंद झाली़
भूम तालुक्यातील भूम मंडळात १० मिमी, ईट- १४ मिमी, अंबी १२मिमी, माणकेश्वर- १५ मिमी, वालवड- १० मिमी पाऊस झाला़ वाशी तालुक्यातील वाशी मंडळात ११ मिमी, तेरखेडा- १० मिमी, पारगाव मंडळात १२ मिमी पाऊस झाला़ तर परंडा मंडळात ५ मिमी, आनाळा - ४ मिमी, जवळा (बु़)- ७ मिमी, सोनारी- १७ मिमी व आसू मंडळात ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यातील ४२ पैकी १५ मंडळात १० मिमीच्या वर पाऊस झाला आहे़ तर इतरत्र पावसाचा जोर खूपच कमी होता़ जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अद्यापही कोरडे असल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात रविवारी बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली मात्र, तुळजापूर तालुक्यातील इटकळ व लोहारा तालुक्यातील जेवळी मंडळात पाऊस झाला नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे़
मागील २४ तासात उस्मानाबाद तालुक्यात ९़८८ मिमी, तुळजापूर- ४़४३ मिमी, उमरगा - ५़२० मिमी, लोहारा - २ मिमी, कळंब - ११़६७ मिमी, भूम - १२़२० मिमी, वाशी - ११ मिमी तर परंडा तालुक्यात ७़६० मिमी पाऊस झाला आहे़